Social Icons

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

भुईकोट किल्ला, खर्डा


जामखेड तालुक्यातील परमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन, ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे. गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे. खरड्याची लढाई हि इतिहासातील प्रसिद्ध लढाई येथेच झालेली आहे. हैदराबाद चा निजाम व मराठ्यांमध्ये १७९५ साली हि लढाई झाली होती. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.

1 टिप्पणी(ण्या):

 
For More Details About this Blog
Mo. no. +91 8055373718
Mail- kedarsmoto@gmail.com
Mitra Blogging Services, Ahmednagar