Social Icons

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

पद्मभूषण डॉ रजनीकांत शंकरराव आरोळे

पद्मभूषण डॉ रजनीकांत  शंकरराव आरोळे
एक थोर डॉक्टर /समाजसेवक .आरोग्य सुविधा गोरगरीबांपर्यंत पोहचवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

आरोळ्यांनी इ.स. १९५९ एम्.बी.बी.एस्. वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यांनी इ.स. १९६० मध्ये कर्नाटकातील कोलार येथे निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला. यानंतर इ.स. १९६२ साली त्यांना नगर जिल्ह्यातील वडाळा मिशनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. फुलब्राइट शिष्यवृत्तिधारक म्हणून त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले


इ.स. १९७० साली त्यांच्या पत्नी मेबेल आरोळे यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी ग्रामीण आरोग्य प्रकल्प त्यांनी सुरू केला. कोठारी कुटुंबीयांनी दान दिलेल्या ७ एकर जमिनीवर त्यांनी हा प्रकल्प राबयला सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक गरिबांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. त्यांनी मुख्यत्वे कुष्ठरोग, क्षयरोग, आदिवासी भागातील बाळंतपणानंतरचे जंतूसंसर्ग व कुपोषण यावर कार्य केले. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३०० खेडी येतात.आरोळे अखेरच्या कालखंडात ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २५ मे, इ.स. २०११ ला त्यांना जामखेडहून पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे हलविले. उपचार सुरू असताना रात्री १०.१५ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. २६ मे, इ.स. २०११ रोजी जामखेड येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या या समाज कार्याबाबत त्यांना १९७९ साली त्यांना  मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले. तर भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

 
For More Details About this Blog
Mo. no. +91 8055373718
Mail- kedarsmoto@gmail.com
Mitra Blogging Services, Ahmednagar